करोना युध्द
जागतिक करोणा विषाणू प्रहार या भयंकर प्रलयकारी महामारी आजाराच्या अदभुत अनुभवातून आपण जात आहोत. चिंता आणि भीती या दोन गोष्टीने आपले मन व्यापून टाकले आहे. खरं म्हणजे चिंता आणि भीती ह्या दोन्हीही भावना मानवी स्व रक्षणासाठी आवश्यक आहेत .
पण कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ती
हानिकारक ठरू शकते त्यामुळे चिंता आणि भय प्रमाणात ठेवण्यासाठी आपण खालील गोष्टी विचारात घ्यावेत….
१. परिस्थिती समजून घेणे.
करोणा हा आजार सामान्य सर्दी सारखा आजार आहे. फरक एवढाच की तो एकमेकापासून पसरण्याची क्षमता जास्त आहे.
आजपर्यंत इतर देशात या आजाराच्या प्रमाणाचा अभ्यासात असे दिसून येते की हा आजार लोकसंख्येच्या केवळ एक ते दोन टक्के लोकांना झाला आहे. म्हणजे १००० लोकवस्तीत १० ते २० जणांना आजार झाला आहे. यात या आजाराने झालेल्या मृत्यूचे प्रमाण २ ते ३ टक्के असे आहे. म्हणजे दहा हजार लोकसंख्येमागे २ ते ३लोकांचा मृत्यू असं या आजाराचं सरळ समीकरण आहे.
भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे कदाचित याचे प्रमाण इतर देशांपेक्षा जास्त असू शकते. म्हणूनच या आजाराविषयी इतर देशा पेक्षा भारत सरकार जास्त गंभीर आहे.
तसे पाहता आजार जसे टीबी, मलेरिया, डेंगू, कॅन्सर, अपघात इत्यादी आजारामुळे मृत्यूचे प्रमाण या आजारापेक्षाही आकडेवारीने जास्त आहे.
म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी ९७ ते ९८ टक्के लोक या आजाराने मरणार नाहीत.
२. परिस्थिती स्वीकारणे
मृत्यूची भीती ही जगातली नंबर एक ही भीती मानले जाते त्यामुळे आपल्याला भीती वाटणे हे काही वेगळे नाही.
एकूण भीती पैकी नव्वद टक्के वेळा ही भीती खरी नसते हे अंतिम सत्य आहे.
पृथ्वीतलावर येणाऱ्या प्रत्येक मानवाचं मरण म्हणजे एक्सपायरी डेट ही ठरलेली आहे हेही अंतिम सत्य आहे.
जिवंत असताना भीतीने मेल्यासारखे राहणे हे जास्त धोकादायक आहे.
३. उपाययोजना करणे
हा आजार होऊ नये म्हणून खालील उपाय करू शकतो….
आजाराची भीती न बाळगणे….. चिंता आणि भीती यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन माणूस आजाराला जास्त बळी पडण्याची शक्यता असते म्हणून न डगमगता सामोरे जाणे हेच गरजेचे आहे.
नकारात्मक गोष्टीपासून उदाहरणार्थ मोबाईल, टीव्ही वरच्या बातम्या, बनावट व्हिडिओ, वर्तमानपत्रातील बातम्या यापासून दूर राहणे आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. विनोदी वाचन व कार्यक्रम पाहणे, सकारात्मक तसेच अध्यात्मिक वाचन,व्हिडिओज पाहणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.
रोग प्रतिकार शक्ती वाढवणे.. योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन प्रत्यक्षात करणे, किमान सहा तास झोप घेणे,किमान दिवसातून दोन वेळेला चांगला आहार घेणे,भरपूर पाणी पिणे, शारीरिक कष्ट किंवा व्यायाम दररोज करणे, मनामध्ये चांगले विचार रुजवणे इत्यादी गोष्टीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती अबाधित राहून कोणत्याही आजाराला लढण्याची शमता वाढवता येते.
प्रत्येक आजाराला काही काळानंतर मानवामध्ये त्याविरुद्ध लढण्याचे शस्त्र तयार करण्याची प्रक्रिया देवाने ऑटोमॅटिक सर्वांच्या शरीरामध्ये फिट केलेली आहे त्यामुळे काही दिवसानंतर या आजाराविषयी रोग प्रतिकारशक्ती आपल्या सर्वांच्या शरीरात दिसून येईल यात शंका नाही आखिर उम्मीद पे दुनिया कायम आहे.
सर्दी सारखे आजार किंवा करोना बाधित रुग्णांनी घाबरण्याचे कारण नसून स्वतः काळजी घेणे, औषधे घेणे व स्वतःपासून दुसऱ्याला होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. इतर देशातून आणि भारतातून ९७ ते ९८ टक्के रुग्ण या आजारातून बरे होत आहेत.
शिंकताना किंवा खोकताना नाका तोंडासमोर रुमाल किंवा हात धरणे, नियमीत हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशी खबरदारी घेतली तर निश्चितच यातून आपण बाहेर पडू.
असं म्हणतात म्हणतात की ज्याला का जगायचं हे कळलं तर त्याच्यासाठी कसं जगायचं हा प्रश्न उरत नाही म्हणून आपण मनाने हरवून न जाता तुम्ही या पृथ्वीतलावर येण्याचं कारण जर शोधालात तर तुमच्यासाठी हा आजार काहीही करू शकणार नाही…. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य लाभो .
Very Nice & Important Information.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery Good Information.
ReplyDelete